Thursday, September 10, 2026
Latest NewsLIFESTYLE

कामसूत्र ने लॉन्च केले सेक्स वेलनेस कॅटेगरीमधील पहिले एनएफटी

नवी दिल्ली :  सेक्श्युअल वेलनेस अर्थात लैंगिक आरोग्य क्षेत्रातील भारतातील आघाडीचा ब्रँड कामसूत्र ने या कॅटेगरीमध्ये देशातील पहिले एनएफटी लॉन्च केले आहेत. ‘लैंगिक संबंध हा एक आनंद आहे’ हा विचार भारतीय समाजासमोर ठेवणारा, नवप्रवर्तक ब्रँड म्हणून लोकप्रिय असलेल्या कामसूत्रने जगभरात ६५ दशलक्ष युजर्स असलेल्या, देशातील सर्वात मोठ्या कॉन्व्हर्सेशन मीडिया प्लॅटफॉर्म बॉबल एआयसोबत प्रस्तुत केलेल्या लैंगिक आरोग्य अभियानांतर्गत ६ वेगवेगळे एनएफटी सादर केले आहेत.

लैंगिक आरोग्य श्रेणीमध्ये पहिल्यांदा एनएफटी आणणाऱ्या कामसूत्र या रेमंड कन्ज्युमर केयरच्या ब्रँडने एनएफटीच्या विक्रीतून जमा होणारी रक्कम पाथफाईंडर इंटरनॅशनलला दान करण्याचे ठरवले आहे.  पाथफाईंडर इंटरनॅशनल जागतिक स्तरावरील, विनानफा तत्त्वावर काम करणारी संघटना आहे जी लैंगिक आरोग्य आणि प्रजनन आरोग्यावर भर देत काम करते.

या श्रेणीमध्ये गेल्या तीन दशकांपासून आपली प्रभावी ओळख कायम राखून असलेल्या कामसूत्र ब्रँडने केलेले हे लॉन्च जेनझेड म्हणजेच आजच्या युवापिढीमध्ये कामसूत्र ब्रँड आणि त्यांच्या उत्पादनांची अनुरूपता व लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा उपयोग करण्याची इच्छा वाढवेल.

एनएफटीमध्ये कामसूत्रच्या पदार्पणाविषयी रेमंड कन्ज्युमर केयरच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर पूजा सहगल म्हणाल्या, “आजवर सादर केलेल्या अनेक संस्मरणीय कॅम्पेन्समुळे खूप लोकप्रिय असलेला, अनोखा ब्रँड म्हणून आता या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदा एनएफटी लॉन्च करत कामसूत्रने वेब ३.० विश्वात पाऊल ठेवले आहे आणि इथून आम्ही अतिशय मोठा विस्तार करत वेगाने आगेकूच करणार आहोत. अत्याधुनिक आणि भविष्यासाठी अनुरूप ब्रँड अनुभव निर्माण करणे आमचे उद्दिष्ट आहे, जे उत्तम भागीदारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच शक्य आहे. मॅडिसन आणि बॉबल एआयसोबत काम करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला अद्वितीय सोल्युशन्स देतात शिवाय एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा विचार, संवाद सुगम करण्याची प्रवृत्ती याठिकाणी निर्माण केली जाते.”

पहिल्या टप्प्यामध्ये कामसूत्रने एक कन्व्हर्सेशन मीडिया मार्केटिंग कॅम्पेन सुरु केले, ज्यामध्ये ९ कामसूत्र ब्रँडेड स्टिकर्स तयार केले गेले. कामसूत्र कंडोम्सचे आकर्षक फ्लेवर्स दर्शवणारे हे स्टिकर्स प्रसिद्ध चॅट प्लॅटफॉर्म्सवर गप्पांमध्ये वापरले जाण्यायोग्य होते. त्यापैकी सर्वाधिक चांगली कामगिरी बजावणाऱ्या तीन स्टिकर्सना कॅम्पेनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडले गेले, यामध्ये तीन अजून एनएफटीचा देखील समावेश आहे ज्यांना स्क्रॅचमधून बनवून एनएफटी म्हणून तयार करण्यात आले आहे.  हे एनएफटी कामसूत्र आणि बॉबल एआय या दोहोंच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

ही भागीदारी ज्यांनी सुगम बनवली अशा मॅडिसन मीडिया एसच्या सीओओ श्रीमती वंदना रामकृष्ण म्हणाल्या, “कामसूत्रसोबत व्हीयूसी क्षेत्रात आम्ही नव्या संधींचा शोध घेत आहोत.  या कॅटेगरीमध्ये हे पहिल्यांदा घडून येत आहे.  डिजिटल विश्वाचा अनुभव घेण्याच्या आमच्या पद्धतींमध्ये खूप मोठे परिवर्तन मेटावर्समुळे घडून आले आहे.  याचा लाभ घेतल्याने ब्रँड्स अनोखे व कनेक्टेड अनुभव निर्माण करू शकतील.  आमच्या ब्रँडला नव्या उंचीवर घेऊन जाताना आणि मेटावर्समध्ये त्यांच्या पदार्पणात त्यांचे भागीदार म्हणून काम करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.”

कामसूत्रसोबत भागीदारीबद्दल बॉबल एआयचे सह-संस्थापक व सीईओ अंकित प्रसाद यांनी सांगितले, “या कॅटेगरीमध्ये पहिल्यांदा राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला आणि जेनझेडला लैंगिक आरोग्याविषयी अधिक जास्त जागरूक करण्यासाठी ब्रँडमार्फत केल्या जात असलेल्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा आहे.  स्टिकर्स, जीआयएफ आणि अशा अनेक प्रकारे संवाद, बातचीत अधिक जास्त आकर्षक, आठवणीत राहण्याजोगी बनवण्यासाठी आम्ही बॉबलमध्ये सर्व उद्योगक्षेत्रातील अनेक ब्रँड्ससोबत काम करतो.  कामसूत्रसोबत आमच्या भागीदारीमार्फत मेटावर्समध्ये आम्ही पुढचे पाऊल उचलले आहे.  ग्राहक त्यांच्या दैनंदिन गप्पांमध्ये बॉबल एआयचे स्टिकर्स सामील करू शकतील आणि nft.bobble.ai वर एनएफटी खरेदी देखील करू शकतील.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading