Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

भारतीय स्टार्टअप LXME ला अधिकृत प्लॅटिनम ज्युबिली पेजेंट कॉमेमोरेटिव्ह अल्बममध्ये स्थान

मुंबई : भारतातील आघाडीच्या महिला सक्षमीकरणाचे उदाहरण मांडत फिनटेक स्टार्टअप LXME ला युनायटेड किंगडमची राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध झालेल्या अधिकृत प्लॅटिनम ज्युबिली पेजेंट कॉमेमोरेटिव्ह अल्बममध्ये स्थान देण्यात आले आहे. प्रतिष्ठेच्या अधिकृत प्लॅटिनम ज्युबिली पेजेंट कॉमेमोरेटिव्ह अल्बम मध्ये राणीच्या ७०  वर्षांच्या कारकिर्दीतील कामगिरी आणि विजयांचे चित्रण करण्यात आले आहे आणि देशभरातील आणि राष्ट्रकुलामधील निवडक उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांची निवड करून त्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.

‘प्लॅटिनम ज्युबिली पेजेंट कॉमेमोरेटिव्ह अल्बम’ हा अल्बम ५ जून २०२२ रोजी यूकेच्या चार दिवसांच्या बँक हॉलिडे वीकेंडच्या वर्धापनदिन उत्सवाचा भाग म्हणून सादर करण्यात आला.

या कार्यक्रमात आमंत्रित केल्या जाणाऱ्या भारतीय उद्योजकांपैकी एक असल्याने, LXME च्या संस्थापक आर्थिक स्त्रीवादी प्रिती राठी गुप्ता यांनी कंपनीचे प्रतिनिधित्व केले आणि महिलांसाठी एक अनोखे मूल्य प्रस्ताव उभारण्याच्या नेतृत्वात स्त्रीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून त्या उभ्या राहिल्या.

महाराणी या जगभरातील महिला नेतृत्वाची प्रतिमा आहे. इतर महिलांना नेतृत्वाच्या भूमिकेत, विशेषत: ऐतिहासिक कालापासून पुरुषांचे वर्चस्व असलेल्या उद्योगांमध्ये अग्रणी स्थानी आणणे हा या उपक्रमामागील एक भक्कम मुद्दा आहे.

या यशाबद्दल, LXME च्या संस्थापक प्रिती राठी गुप्ता म्हणाल्या, “भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी आमच्या सर्व प्रयत्नांना आणि आम्ही सहन केलेल्या क्लेशाना जागतिक मान्यता मिळाल्याबद्दल आम्ही कृतज्ञ असून आमचा हा सन्मान आहे. LXME मध्ये, भारतीय महिलांसाठी वित्तपुरवठा सुलभ करण्याचा आणि त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सूत्रे त्यांच्या ताब्यात देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही जागतिक मान्यता आम्हाला आर्थिक आणि गुंतवणूक क्षेत्रातील अधिक समानता, विविधता आणि सर्वसमावेशकतेचे फायदे प्रदर्शित करण्यास सक्षम करेल.”

प्लॅटिनम ज्युबिली पेजेंट साजरे करताना प्रकाशित होणारे एकमेव अधिकृत पुस्तक प्रकाशक सेंट जेम्स हाऊस द्वारे निर्मित आणि टॉम पार्कर बाउल्सच्या योगदानासह रॉयल लेखक रॉबर्ट जॉब्सन आणि केटी निकोल यांनी लिहिलेले आहे.

संपत्ती आणि समृद्धीची हिंदू देवता लक्ष्मीच्या नावावर आधारित असलेला LXME हा भारतातील आर्थिक लैंगिक असमानता कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणारा महिला-प्रथम आर्थिक मंच आहे. २०२० च्या मध्यात स्थापन झालेला LXME मंच महिलांचा एक समुदाय तयार करून आणि त्यांच्यात संवाद घडवून आणत महिलांसाठी आर्थिक बाबी सुलभ करते ज्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक प्रवासावर अधिक नियंत्रण मिळविण्याबद्दल आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या त्यांच्या आर्थिक प्रवासात प्रगती करत असताना एकमेकींकडून शिकतात. प्रिती राठी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली LXME हे महिलांच्या एका शक्तिशाली संघाद्वारे चालवले जाते आणि कल्पनातीत प्रभाव निर्माण करणे हे त्यांचे जीवनध्येय आहे.

LXME च्या संस्थापक प्रिती राठी गुप्ता यांनी १००,००० हून अधिक महिलांना त्यांच्यात आर्थिक कौशल्य निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या छोट्या बचतीचे आर्थिकीकरण करण्यासाठी नेतृत्व आणि प्रेरणा दिली आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या गुप्ता यांनी वायपीओ मध्ये भारतातील सर्वात मोठ्या वित्तीय सेवा समूहांपैकी एक असलेल्या आनंद राठींच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि इश्का फिल्म्सच्या संस्थापक म्हणून नेतृत्वाची पदे भूषवली होती. कमोडिटीज डेस्क, करन्सी आणि फॉरेक्स अॅडव्हायझरी बिझनेसच्या स्थापनेसाठी सन्मानित अशा त्या एक नामांकित तज्ञ असून BFSI उद्योगातील दोन दशकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि आता महिला आणि संपत्ती यांच्यातील दरी कमी करण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading