Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

धायरीतील मल्हार गड खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण

पुणे : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एनपीसी संस्था, संस्कृती फाउंडेशन व सिंहगड ट्रेकर्स परिवार यांच्या वतीने धायरी येथील मल्हार गड खंडोबा मंदिर आणि नारायणराव सणस विद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आठ ते दहा फूट उंचीचे वड, पिंपळ, कादंबा, कांचन, सोनचाफा, कारंज, सप्तपर्णी आदी देशी वृक्षांची लागवड केली.

यावेळी एनपीसी संस्थेचे अमित शहा, संजय मंडोत, करण उथरा, यासीन देसाई, सिंहगड ट्रेकर्सचे चंद्रशेखर पोकळे पाटील, स्वप्निल लहानमगे, जर्नादन भुमकर, महेश भिसे, संतोष लक्ष्मण पोकळे (माजी पंचायत समिती सदस्य), अतुल काकडे, अर्जुन पवार, भारत खाटपे, नारायणराव सणस विद्यालयचे अशोक कापरे, संस्कृती फाउंडेशनचे शरणू जवळगी, स्नेह वसंत फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

वृक्षारोपणाच्या पहिल्या टप्प्यात धायरी येथील मल्हार गड खंडोबा मंदिर आणि नारायणराव सणस विद्यालय वृक्षारोपणासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती. वृक्षारोपणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुढील टप्प्यात पुणे महानगरालिकेच्या शाळेत वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सिंहगड ट्रेकर्सचे चंद्रशेखर पोकळे पाटील यांनी सांगितले.

अमित शहा म्हणाले, आपण विविध व्यवसाय करत असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारे निसर्गाला हानी पोहचवत असतो. परंतु ती हानी कमी करून आपण पर्यावरण सुदृढ करण्यावर भर दिला पाहिजे. या उपक्रमासाठी मल्हार गड खंडोबा मंदिर, नारायणराव सणस विद्यालय आणि स्नेह वसंत फाऊंडेशनने विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading