Monday, October 26, 2026
Latest NewsMAHARASHTRA

विद्यापीठ विभाजनाच्या विरोधात नामांतर आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन छेडणार

आंबेडकरवादी संघर्ष समिती चे कुलगुरूंद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आंबेडकरी पक्ष संघटनांची विभाजनाविरोधात एकजूट
विद्यापीठाचे विभाजन होऊ देणार नाही

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाविरोधात विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी आक्रमक भूमिका घेत विद्यापीठ विभाजना बाबत शासनाने भूमिका जाहीर करावी अन्यथा नामांतर आंदोलनाच्या धर्तीवर आंदोलन उभे करू असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने कुलगुरू डॉ.प्रमोद येवले ह्यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला.
ह्यावेळी संजय निंबाळकर ह्याची व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य पदावरून हकालपट्टी करावी व उच्चशिक्षण सहसचिव प्रकाश बच्छाव ह्यांची समिती बरखास्त करावी अशी मागणी करण्यात आली.
नामांतर शहिदांच्या बलिदानाचा अवमान करून विभाजना आडून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न जातीयवादी करत आहेत त्यामुळे विभाजनाबाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी असे निवेदनात म्हटले आहे.
ह्यावेळी श्रावण गायकवाड, विजय खंडागळे,श्रीरंग ससाणे,भागतराज भालेराव,आनंद कस्तुरे,वंचितच्या नेत्या शमीभा पाटील,बाळू गंगावणे,वसंत वक्ते,सचिन निकम,बलराज दाभाडे,नानासाहेब म्हस्के,बाळू वाघमारे,गुणरत्न सोनवणे,दीपक निकाळजे,शैलेंद्र मिसाळ,राहुल वडमारे,पवन पवार,नवल सूर्यवंशी,मनीष नरवडे, एड.अतुल कांबळे,अतुल खरात,राहुल मकासरे,विकास रोडे,स्वप्नील शिरसाठ,सिद्धार्थ मोरे,भागवत चोपडे, संदीप तुपसमुद्रे,लोकेश कांबळे, अमोल खरात,विजय जाधव,कैलास काळे,अमोल होर्शीळ, अजय गाडे, अमोल भालेराव,सचिन तिवारी ,किरण तुपे,क्षितिज नितनवरे,शैलेश लांडगे,जयश्री शिरके,हेमत खोतकर, सूर्यवंशी,संजय म्हस्के,गौतम भिसे, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading