Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

HSC Board – बारावीचा निकाल उद्या

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result) उद्या (दि.8) जाहीर करण्यात येणार आहे. उद्या दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

राज्यातील सर्व विभागांचे दहावी आणि बारावी बोर्डाचे निकाल हे येत्या काही दिवसातच जाहीर होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. त्यानुसार उद्या बारावीचा निकाल लागणार आहे. कोरोना आटोक्यात आल्याने यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान बारावीची परीक्षा झाली होती. राज्यातून 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना या निकालाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या दुपारी एक वाजता www. mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या परीक्षेचा सीट नंबर आणि आईचं नाव माहिती असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर त्याच्या दोन-तीन प्रिंट घेऊन ठेवणे आवश्यक आहे. कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळेपर्यंत काही दिवस जातात. तोपर्यंत पुढील वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading