Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

BPCL तर्फे सीएसआर उपक्रम ‘इंटिग्रेटेड कॅन्सर क्युअर अँड केयरला’ पाठिंबा

मुंबई :  भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातील पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी

इंटिग्रेटेड कॅन्सर क्युअर अँड केयर या सीएसआर उपक्रमाला इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने पाठिंबा देत आहे. या संस्थेद्वारे कर्करोगाशी संबंधित प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक काळजी घेतली जाते. या प्रकल्पामध्ये मौखिक, स्तन आणि सर्व्हिकल कर्करोगाची चाचणी करणाऱ्या शिबिरांचे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर पॅन भारतातील १० सरकारी/ना नफा तत्वावर काम करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आणि कर्करोगातून वाचलेल्यांसाठी पुनर्वसन उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले.

बीपीसीएलने आपल्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण कर्करोग विश्वाला मदत केली आहे. ‘उगम – अ व्हॉलेंटरी कॅन्सर सर्व्हायव्हर्स’ सपोर्ट ग्रुप कंपनीच्या उपक्रमांचा महत्त्वाचा भाग असून उपचार पूर्ण केलेल्या चाइल्डहूड कॅन्सर सर्व्हायव्हर्सनी त्याची स्थापना केली आहे. उगम म्हणजे जन्म होणे. या नावातून लहानपणी कर्करोगावर मात केलेल्यांची निश्चयी वृत्ती, आयुष्यातल्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची जिद्द अधोरेखित होते. कर्करोगातून वाचलेल्यांना सक्षम करण्यासाठी आणि लहानपणी होणारा कर्करोग बरा होऊ शकतो हा संदेश समाजात पसरवण्यासाठीचे दूत तयार करण्याच्या उद्देशाने उगमची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण वर्षभरात उगमचे स्वयंसेवक विविध उपक्रम राबवून कर्करोग बरा होण्याविषयी जागरूकता पसरवतात आणि कर्करोगातून वाचलेल्यांमध्ये नाते निर्माण करतात.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे ७०० कर्करोग चाचणी शिबिरांना सहाय्य करून पुणे, कोल्हापूर, वाराणसी आणि कोलकाता येथए मौखिक, स्तन आणि सर्व्हायकल कर्करोगाची चाचणी घेण्यात आली. या शिबिरांच्या माध्यमातून २ वर्षांत ७०,००० लाभार्थींची चाचणी करण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत इंडियन कर्करोग सोसायटी या कर्करोगाविषयी जागरूकता, निदान, उपचार, कर्करोग झालेल्यांना सर्व्हायव्हरशीप इत्यादी क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थेने कर्करोगातून वाचलेल्या वंचित लहान मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समग्र पुनर्वसन उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत सर्व्हायरशीप क्लिनिक्सची स्थापना करणे, शैक्षणिक मदत, व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम आणि उगम – चाइल्डहूड सर्व्हायवरशीपसाठी सपोर्ट ग्रुप नेटवर्क यांचा समावेश होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading