fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व अभिवादन

पुणे – वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.

महाराणा प्रताप उद्यानातील महाराणा स्मारकातील पुतळ्यास सकाळी ९.३० वाजता पुष्पहार अर्पण व अभिवादन केल्यावर गुणवंत व कर्तबगार व्यक्तिंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने शासन परिपत्रक काढुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर वीरशिरोमणी महाराणाजींना शासनाने राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केल्याने यावर्षी संपुर्ण राज्यांमधे व पुणे शहरात यंदाची जयंती मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक, धार्मिक मिरवणूक व अभिवादन करुन साजरी करण्यात येणार आहे.

शोभायात्रा महाराणा प्रताप उद्यान येथून सुरुवात होईल. चिंचेची तालीम , सेवा मंडळ, फडगेट पोलीस चौकी शितळादेवी चौकातून मिठगंज पोलीस चौकी मार्गे कस्तुरे चौकात समारोप होईल. मिरवणुकीत ढोल ताशा पथक व बँड पथक देखील सहभागी होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading