fbpx
Monday, June 17, 2024
BusinessLatest News

क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे कामगार कल्याण योजनांबाबत जागृती कार्यक्रम

पुणे  : ” बांधकाम मजुरांचे कायदेशीर हक्क आणि त्यांच्यासाठी उपाब्ध सुविधा याबाबत जनजागृती करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे बांधकाम आणि इतर कामगार (बीओसीडब्ल्यू) नोंदणी आणि महाराष्ट्र लेबर वेल्फेअर बोर्ड’तर्फे (एमएलडब्ल्यूबी) दिल्या जाणाऱ्या योजनांबाबत जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कामगार कल्याण विभागाचे सहायक आयुक्त समाधान भोसले, कामगार विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रय पवार, क्रेडाई – कुशल’चे अध्यक्ष जे.पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे कामगार कल्याण समितीच्या समन्वयक सपना राठी, सह-समन्वयक  मिलिंद तलाठी, पराग पाटील, क्रेडाई पुणे मेट्रोचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी उपस्थित होते. मनुष्यबळ संसाधन, सुरक्षा आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील १७० हून अधिक  कर्मचारी, प्रतिनिधी  सहभागी झाले होते.

भोसले म्हणाले,” महाराष्ट्र लेबर वेल्फेअर बोर्ड’चे सर्व योजना, सुविधा हे ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत. कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबाना चांगल्या सुविधा आणि संधी उपलब्ध करून देत, एक आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. आम्ही लवकरच या सदस्यांसाठी आणि  त्यांच्या कुटूंबियांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम उपलब्ध करून देणार आहे. यांतर्गत संबंधितांना बँकिंग, फायनान्स, आयटी सपोर्ट, डिजिटल मार्केटिंग असे विविध कोर्सेस मोफत स्वरूपात उपलब्ध असणार आहे. बीओसीडब्ल्यू, एमएलडीबी सदस्यांसाठी आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती, कौशल्य विकास असे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. या सर्व योजनांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा.”

पवार  म्हणाले,” बीओसीडब्ल्यू कार्ड’चा वापर करून कामगार  मध्यान्ह भोजन, सुरक्षितता आणि आवश्यक किट, वैद्यकीय सहाय्य, प्रसूती लाभ, अपघात कवच, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक मदत, कुटुंबातील सदस्यांना मदत. मृत्यू, समूह विमा, गृहकर्ज आणि अंत्यसंस्कार सहाय्य  विविध २८ योजनांचे फायदे मिळविण्यासाठी अर्ज करू शकतात. ही नोंदणी करण्यासाठी, मजुराचे वय 18 वर्षे आणि त्याहून अधिक असावे. नोंदणी शुल्क हे केवळ 37 रुपये असून, त्यासाठी आधार कार्ड, बँक स्टेटमेंट आणि कंत्राटदाराकडून 90 दिवसांच्या कामाचे प्रमाणपत्र, नोंदणी फॉर्म आणि रु. शुल्कासह एक प्रत सादर करावी लागेल.  प्रत्येक प्रकल्पावरील अधिकाधिक कामगारांची बीओसीडब्लूअंतर्गत नोंदणी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एकदा नोंदणी झाल्यानंतर कामगाराने प्रत्येक वर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार, एचआर कर्मचारी यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.”

श्रॉफ म्हणाले, ” बांधकाम क्षेत्रात सुरक्षेतील त्रुटींमुळे अनेक अपघात होत असतात, ते टाळणे आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रात सुरक्षा उपाययोजनांच्या स्वीकार्हतेला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच आम्ही ‘प्राईड बेस्ट फैसिलीटी’  पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. सुरक्षा, सुविधा, स्वच्छता, वर्तणूक, अशा विविध गोष्टींचा समावेश यामध्ये आहे. यामुळे बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी आंतराराष्ट्र्रीय मानकांनुसार सुविधा उपलब्ध होण्यास मदत मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading