Wednesday, June 3, 2026
Latest NewsLIFESTYLEPUNE

युवकांनी व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा यावर भर द्यावा – अजित पवार

उरुळी कांचन : पूर्वी हॉटेल व्यवसायावर ठराविक समाजाची मक्तेदारी असायची. मात्र आता हे चित्र बदलेले आहे. हॉटेल व्यवसायात आता मराठा समाजासह अन्य समाजातील युवक देखील सहभागी होत आहे. या व्यवसायात उतरल्यानंतर युवकांनी स्वच्छता, दर्जा, सचोटी, प्रामाणिकपणा यावर भर द्यावा. सर्वसामान्यांना परवडले असे दर ठेवा असं मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे जानाई रिसॉर्ट चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, रमेश थोरात, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, सोपान कांचन, सरपंच राजेंद्र बबन कांचन, उपसरपंच अनिता बगाडे, पोपट कांचन, सौ. रोहीणी पोपट कांचन, सागर पो. कांचन, मयुर पो. कांचन, संदीप गव्हाणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले, उरुळी कांचन, लोणी काळभोर व कदमवाक वस्ती या ग्रामपंचायतींचे नगरपरिषदेमध्ये आणि नगरपंचायती मध्ये रूपांतर करावे अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading