Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, व्यवस्थापकासह तीन महिलांना अटक

पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील विमान नगर परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकासह तीन महिलांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

इमदादुल्ला इस्माईल अली (वय 19) असे अटक करण्यात आलेल्या मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाचे नाव आहे. तर मसाज सेंटरचे मालक शंतनू सरकार, शमशुद्दीन आणि जयराम वालपुली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील गल्ली क्रमांक तीनवरील अमेय स्पा नावाच्या बंगल्यात हा वेश्याव्यवसाय सुरू होता. ‘जस्ट डायल’वर विमाननगर परिसरातील मसाज पार्लरबाबत  माहिती देण्यात आली होती. येथे सर्च केल्यानंतर स्पा सेंटरमधील कामगारांकडून संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला जात असे. त्यानंतर त्याला ग्राहक बनवून मसाजच्या नावाखाली जास्तीचे पैसे उकळल्या जात होते. जास्त पैसे उकळून वेश्याव्यवसाय केला जात होता. या प्रकारची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली होती. त्यानुसार येथे छापा टाकण्यात आला.

फोटो – संग्रही

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading