Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात येत्या चार दिवसात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : केरळमध्ये मान्सून अंदाजापेक्षा तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळणार आहे. राज्यात पुढील चार दिवस विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD)ने दिलेल्या माहिती नुसार, ‘आसानी’ या वादळाच्या प्रभावामुळे अपेक्षीत तारखेपेक्षा तीन दिवस आधी केरळमध्ये दाखल झाला आहे. आता दक्षिण अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांच्या हालचालींना वेग आला आहे. दक्षिण अरबी समुद्राचे बरेचसे क्षेत्र मोसमी वाऱ्यांनी व्यापले असून श्रीलंकेचा जवळपास अर्धा भाग व्यापून ते केरळ पर्यंत पोहोचले आहे.  बंगालच्या उपसागरात दोन दिवसांपासून त्यांचा प्रवास थांबला आहे. आता मात्र या वाऱ्यांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, पुढील दोन दिवसात आणखी प्रगती करतील.

या वातावरणीय हलचालींमुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. तसेच येत्या चार दिवसात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच माराठवाड्यातील काही भागात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD)ने वर्तविला आहे. मात्र हे मान्सूनचे आगमन नसून हा मान्सून पूर्व पाऊस असणार असल्याचेही IMDने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading