पुणे शहरात गुरुवारी काही भागातील पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (दी. 2 जून) बंद राहणार आहे. लष्कर , पर्वती , एस. एन. डी. टी, वारजे नवीन व जुने होळकर जलकेंद्राच्या तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पासवकर यांनी ही माहिती दिलीआहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा भाग –
पर्वती जलकेंद्र भाग – पर्वती, पद्मावती, इंदिरानगर पंपींग, शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरुड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं. 42, 46 (कोंढवा खुर्द), पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
लष्कर जलकेंद्र पंपींग भाग
लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी.
चतु:श्रृंगी/एस. एन. डी. टी/वारजे जलकेंद्र परीसर
भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रोड परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय – वे परिसर, रामनगर, कर्वेरोड परिसर, एरंडवणा, कोथरुड, डेक्कन जिमखाना, जयभवानीनगर, सुतारदरा, डहाळूकर कॉलनी, परंमहंसनगर, कर्वेनगर, गांधीनगर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड, वारजे जकात नाका, शिवाजीनगर, भोसले नगर, घोलेरोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यु कॉलनी, पोलीस लाईन, संगमवाडी, भांडारकर रोड.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र
मुळा रोड, खडकी, हरीगंगा सोसायटी इत्यादी.
