डॉ. नीलम गोऱ्हेंना जीवे मारण्याचे धमकीचे पत्र
पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना ताजी असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र देण्यात आले आहे.
विधवा महिलांच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर विधवा महिलावर बलात्कार करण्याची विकृत धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच विधवा महिलांचा अपमान होणार नाही. यासाठी पतीच्या निधनानंतर काढून घेण्यात येणारी प्रतीके न काढण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे पुण्यात बैठक घेतली होती.
नीलम गोऱ्हे यांच्या पीएला फोन करुन धमकी देण्यात आली. तसेच निलम गोऱ्हे यांना ईमेलवरूनही धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी नगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूरमधील हेरवाड ग्रामपंचायतने ‘विधवा प्रथा निर्मूलन’ बाबत निषेध व्यक्त केला आहे. या माथेफिरुने महिला अध्यक्ष, स्त्री आधार केंद्र, मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय तसेच अन्य मान्यवरांना हेरवाडच्या या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत 25 मे, 2022 एक मेल पाठविला आहे. या माथेफिरुने स्वतःच्या विधवा आईवरच बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. या विधवा महिला निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विधवा महिलांवर बलात्कार करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
