Friday, October 23, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNESportsTOP NEWS

देशात खेलो इंडियाची १००० केंद्र बनावी – केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर

पुणे,:- मल्लखांब, कबड्डी यांसारखे मातीतले स्थानिक खेळ जागतिक पातळीवर पोहोचण्याची क्षमता आहे. ‘खेलो इंडिया’ च्या माध्यमातून अनेक खेळाडू पुढे आले. ४५० केंद्रांना मान्यताही मिळाली आहे तर भारतात ‘खेलो इंडिया’ ची एकूण १००० केंद्र निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कार्यक्रम मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील २७ एकरातील क्रीडा संकुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले पै.खाशाबा जाधव यांचे नाव देण्यात आले. यासोबतच पै.खाशाबा जाधव आणि युवकांचे प्रेरणास्थान म्हणून स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांचे अनावरणही अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य सुनेत्रा पवार, राजेश पांडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ संचालक डॉ. दीपक माने, खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव, ओलिम्पिक विजेते खेळाडू अंजली भागवत, मारुती आडकर, रेखा भिडे आणि मनोज पिंगळे आदीही यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाच्या विद्यार्थिनीनी योग प्रात्यक्षिके सादर केली. मूर्तिकार संजय परदेशी आणि विवेक खटावकर यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.

क्रीडासंकुलाबाबत बोलताना ठाकूर पुढे म्हणाले, ही मैदाने कधीही रिकामी राहता कामा नये. सातत्याने येथे विविध स्पर्धा व्हायला हव्यात. विद्यापीठ स्तरावर महाराष्ट्रात स्पर्धांचे आयोजन करावे यासाठी केंद्राकडून त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मागच्या वर्षीपर्यंत खेळाचे बजेट ६५७ करोडचे होते ते आता ९७० पर्यंत वाढविण्यात आले आहे. तसेच चांगल्या खेळाडूंना आम्ही पाच लाखापर्यंत अनुदानही देऊ असेही आश्वासन ठाकूर यांनी दिले.

डॉ. कारभारी काळे म्हणाले, विद्यापीठाने शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर नाव मिळवले आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील. या संकुलात खेड्यापाड्यातील, सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाईल. महाष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध होतील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजेश पांडे म्हणाले, विद्यापीठाचा परिसर हा ४०० एकरपेक्षा जास्त आहे त्यातील २७ एकर परिसरात हे क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. यासाठी साधारण ९० कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे. इथे देण्यात आलेल्या सर्व सुविधा व सामग्री या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. या क्रीडासंकुलाच्या उभारणीत अनेक माजी कुलगुरूंचे योगदान आहे.डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर व्यवस्थापन परिषद डॉ. संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार दीपक माने यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, डॉ. सुधाकर जाधवर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी मान्यवरही उपस्थित होते.

डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं तर व्यवस्थापन परिषद डॉ. संजय चाकणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार दीपक माने यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर प्रसेनजीत फडणवीस, डॉ. विलास उगले, डॉ. सुधाकर जाधवर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी शिल्पा भिडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी मान्यवरही उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading