Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

‘धरोहर ‘ नृत्य कार्यक्रमातून उलगडली कथ्थक परंपरा !

पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ,मनीषा नृत्यालय प्रस्तुत ‘ धरोहर -लिगसी ऑफ कथक ‘ नृत्य कार्यक्रमाला शनीवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.

ज्येष्ठ नृत्यगुरु पं.मनीषा साठे यांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमातून कथ्थक नृत्याची समृद्ध परंपराच उलगडली.

हा कार्यक्रम शनीवार, २८ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.

‘ धरोहर -लिगसी ऑफ कथक या नृत्य कार्यक्रमाची सुरुवात गुरू मनीषा साठे यांच्या त्रिदेवी स्तुतीने झाली. मनिषा नृत्यालयाच्या ज्येष्ठ शिष्यांनी ताल संयुज सादर केला. आदिती कान्हेरे यांनी ठुमरी प्रस्तुत केली. तेजस्विनी साठे यांच्या यमन रागातील तराण्याने रसिकांची दाद मिळविली.

गौरी स्वकुळ यांनी पं. भीमसेन जोशी यांची ‘पायलिया झनका ये मोरी ‘ ही बंदीश सादर केली. ईशा काथवटे ‘अष्टपदी ‘ सादर केले. आदिती लेले यांनी पं. शिवकुमार शर्मा यांना आदरांजली देण्यासाठी ‘संतूर’ ( इंन्स्ट्रुमेंटल फ्युजन) हा नृत्यप्रकार सादर केला. मंजिरी कारुळकर ‘चतरंग ‘ , मानसी गादो आणि पूर्वा शहा यांनी कवित्त सादर केले. गुरू मनिषा साठे यांनी ‘राधे रानी ‘ हा अभिनय प्रकार सादर केला. कार्यक्रमाची सांगता तत्कार या नृत्य प्रकाराने झाली.

अर्चिता शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १२२ वा कार्यक्रम होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading