Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

शेफलर ट्रूपॉवर वायपर ब्लेड्स

ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केटने शेफलर ट्रूपॉवर अंतर्गत प्रीमियम ग्रेड वायपर्स सादर करून केला पोर्टफोलिओचा विस्तार

पुणे : नामांकित औद्योगिक आणि ऑटोमोटिव्ह सप्लायर शेफलर इंडियाच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट डिव्हिजनने शेफ्लर ट्रूपॉवर लेबल अंतर्गत वायपर ब्लेडची प्रीमियम श्रेणी सादर केली आहे. वायपर ब्लेड्स अद्वितीय अशा प्रीमियम प्लस आणि अल्ट्रा प्रीमियम म्हणजेच अनुक्रमे फ्रेम आणि फ्रेमलेस या दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांमध्ये येतात. हे ब्लेड विशेषतः उच्च दर्जाचे वायपिंग म्हणजेच पुसण्यासाठी आणि कोणत्याही हवामानात चांगली दृश्यमानता प्रदान करण्यासाठी विकसित केले आहेत.

शेफलर इंडियाच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट विभागाचे अध्यक्ष श्री. देबाशिष सत्पथी म्हणाले, “आम्हाला शेफलर ट्रूपॉवर ब्रँड अंतर्गत वायपर ब्लेडची नवीन श्रेणी सादर करताना आनंद होत आहे. वायपर ब्लेड हे वाहनाच्या सुरक्षिततेचा अविभाज्य भाग आहेत. अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत विकसीत कामगिरी आणि सुधारित दृश्यमानता प्रदान करण्यासाठी आमच्या वायपर ब्लेडची चाचणी केली जाते. या सादरीकरणासह, ग्राहकांना प्रगत टिकाऊपणासह अत्याधुनिक उत्पादने सादर करणे हे आमचे प्राधान्य आहे.”

प्रीमियम प्लस फ्रेम वायपर्स अधिक चांगल्या प्रकारे आणि आवाज न करता पुसण्यासाठी ग्रेफाइट कोटिंगसह उत्कृष्ट रबरने बनवले जातात. मजबूत आणि गंज-प्रतिरोधक धातूची फ्रेम दीर्घ आयुष्य प्रदान करते. शेफलर ट्रूपॉवर अल्ट्रा प्रीमियम फ्रेमलेस वायपर्स फ्लॅट-ब्लेड तंत्रज्ञान सादर करतात. ते सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करतात. त्याचा एरोडायनामिक विंड स्पॉयलर वेगवान प्रवासादरम्यान ब्लेड लिफ्ट-ऑफ थांबवतो. वायपर्स क्विक फिक्स अॅडॉप्टरसह येतात. त्यामुळे इंस्टॉलेशन सुलभ होते आणि ५,००,००० पेक्षा जास्त वाइपसाठी अतुलनीय कामगिरी पुरविली जाते.

भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या पॅसेंजर कार आणि हलके व्यावसायिक वाहन विभागातील सर्व प्रमुख मूळ उपकरण उत्पादक (OEMs) कडील १,३०० हून अधिक वाहन प्रकारांसाठी ही श्रेणी उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading