Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सुप्रिया सुळेंना ‘मसनात’ जा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माफीनामा

पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना तोल घसरलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्य महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.


चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरून बोलताना सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सर्वच स्तरातून सुरु झाली होती.
आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap,सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही.
माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading