पुण्यात ATS कडून मोठी कारवाई; दहशतवादी संघटनेशी संबंधित तरुण अटकेत
पुणे : पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून पुण्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील एका अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असल्याने एका तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आज ताब्यात घेण्यात आलेल्या जुनेद मोहोम्मदला दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे .
या प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी संघटनेनी दिलेल्या माहितीनूसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने महिनाभरापुर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणे दहशतवादी विरोधी पथक संबंधीत तरुणाच्या मागावर होते. मात्र हे पैसे त्याला कुठल्या कामासाठी देण्यात आले होते हे मात्र अजून उघड झाल नसल्याचं देखील पुणे एटीएसने सांगितलं आहे.
मिळलेलल्या प्रार्थमिक माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबासाठी काम केलं तर पैसे मिळत होते. यावरुन जुनेदला अटक करण्यात आली आहे. हा तरुण जम्मू काश्मीर मधील एका दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मिर संघटनेच्या संपर्कात आला होता,अशी माहिती आहे. आरोपी जुनेद मोहम्मह हा २८ वर्षांचा असून मुळचा विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. जुनेदला पैसे नेमके का पाठवण्यात आले? तो या पैशांचे काय करणार होता? हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, दहशतवादी कृत्यांसाठीच हे फंडिग करण्यात आल्याचा पुणे दहशतवादी विरोधी पथकाचा आरोप आहे. जुनेद मौहम्मद त्यांच्या भावाबरोबर पु्ण्यातील दापोडी परिसरात राहत होता. अकोला दहशतवादी विरोधी पथकाकडून त्यांची चौकशी सुरु होती
