Friday, October 23, 2026
Latest NewsSports

पदार्पणाच्या सामन्यात अस्पायर एफ सी ची बरोबरी

पुणे – अस्पायर एफ सी संघाने पी डी एफ ए फुटबॉल लीग स्पर्धेत आपला पहिला सामना बरोबरीत सोडवला.

एस एस पी एम एस मैदानावर झालेल्या या सामन्यात अस्पायर संघाला सिटी गर्ल्स गो स्पोर्टस् ने 1-1 असे बरोबरीत रोखले. A गटातील या सामन्यातील दोन्ही गोल उत्तरार्धात झाले. वेदंगी गंडले हिने 39व्या मिनिटाला सिटी संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर वैष्णवी बराटे हिने लांब वरून जाळीचा अचूक वेध घेत अस्पायर संघाला बरोबरी साधून दिली.
महिला गटात डेक्कन इलेवन आणि सासवड संघांनी मोठे विजय नोंदविले. ब गटात डेक्कनने एफसी बेकडिन्हो चा 6-1 असा पराभव केला.

स्वामिनी काकडे आणि अंकिता काळे यांनी पूर्वार्धात गोल केले. दुसऱ्या सत्रात श्रेया हांचाते सानिका देशपांडे, मैत्रयी बिराजदार, कल्याणी देसले यांनी अन्य गोल केले. पराभूत संघासाठी एकमात्र गोल ऐश्वर्या जगताप हिने केला.
सासवड एफ सी संघाने आकांक्षा काकडे हिने नोंदविलेल्या चार गोलच्या जोरावर केशव माधव प्रतिष्ठान संघाचा 6-0 असा पराभव केला. अक्षता जगताप आणि प्राची खैरे यांनी केले.

निकाल

एसएसपीएमएस मैदान येथे: महिला लीग

गट अ: अस्पायर एफसी: 1 (वैष्णवी बराटे 50व्या) बरोबरी वि. सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्स: 1 (वेदांगी गंडले 39व्या)

गट अ: दिएगो ज्युनियर्स: 3 (लेशा डी’कोस्टा 17व्या; भार्गवी पवार 49व्या, 56व्या) वि.वि. कमांडोज: 0

गट ब: डेक्कन इलेव्हन: 6 (स्वामिनी काकडे 6वी; अंकिता काळे 36वी; श्रेया हंकाटे 46वी; सानिका देशपांडे 59वी; मैत्रेयी बिराजदार 60वी; कल्याणी देसले 60वी; कल्याणी देसले 60वी 2) वि.वि. एफसी बेकडिन्हो: 1 (ऐश्वर्या 3वी जगता)

गट अ: सासवड एफसी: 6 (आकांक्षा काकडे 2रा, 5वा, 7वा, 14वा; अक्षता जगताप 4वा; प्राची खैरे 12वा) वि.वि. केशव माधव प्रतिष्ठान : 0

एसएसपीएमएस मैदान – द्वितीय श्रेणी

गट अ:: व्हॅली हंटर्स: २ (ओंकार निरसे ५वा, ५५वा) वि.वि. एफसी जोसेफ: १ (अयान खान ५०वा)

गट ब: राहुल एफए: 5 (आनंद शेंडे १५ वा; रवी यादव २२ वा, ३० वा; शशांक तिवारी ४६ वा; हितेश लुल्ला ५६ वा) वि.वि. पीसीएच लायन्स: 2 (मेंड्रोस फ्रान्सिस २८ वा; एमडी. शरीफ ४८ वा)

गट ब: बोपोडी S.A: 2 (रॉनी रोझारियो १० वा; हर्षल ३१ वा) वि.वि. ग्रीनबॉक्स चेतक ‘ब’: 1 (ऋषिकेश खिलारी ५९ वा)

गट-ब : एनवायएफए: ७ (राहुल सिकदर १४ वा, ५४ वा; धनंजय लडकत २५ वा; वैभव जोशी २७ वा, ५१ वा; ओंकार जोशी ३२ वा; हृषीकेश शेवाळे ३३ वा) वि.वि एनडीए यूथ स्पोर्ट्स क्लब: ३ (राकेश सळुंण १४ वा; राकेश ५४ वा; राकेश साळुंण ४८ वा)

सप महाविद्यालय मैदान – तृतिय श्रेणी

गट ड: लेजेंड्स एफए: ४ (पिंटू दास १०वा; आकाश सांके १९वा, २९वा; रोहित प्रसाद २९वा) वि.वि भोर एफसी: १ (रणजीत भेलके ७वा)

गट ड: पूना सोशल स्पोर्ट्स क्लब: १ (संजय थापा ४८वा) वि.वि दक्षा एफए: ०

पूल-ई: जुन्नर तालुका: 2 (सौरभ पाटील ३० वा; अमोल धर्मारे ३६ वा) बीटी जायंट्झ ‘ब’: 1 (अदनान शेख ५७ वा )

पूल-ई: सासवड एफसी: 0 बरोबरी वि. नॉइसी बॉईज: 0

फोटो ओळ: अस्पायर F.C स्ट्रायकर वैष्णवी बराटेने सिटी गर्ल्स गो स्पोर्ट्सला मागे टाकून बरोबरीचा गोल केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading