Wednesday, June 3, 2026
BusinessLatest News

ग्लेनमार्कतर्फे भारतातील पहिली हॅलो स्किन व्हॉट्सअँप चॅटबॉट सेवा सुरू

पुणे  : त्वचारोगग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन, सल्ला आणि उपचारमिळण्यासाठी ग्लेनमार्क फार्माक्युटिकल्सने ‘हॅलो स्किन’ ही व्हॉट्सअँप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. याद्वारे कोणालाही त्वचा रोगाबाबत योग्य सल्ला मिळवता येईल. ग्लेनमार्कने हा उपक्रम ‘इंडियन असोसिएशन ऑफडर्मेटोलॉजिस्ट विनरॉलॉजिस्ट व लॅप्रोलॉजिस्ट’ या त्वचाविकार संघटनेच्या सहकार्याने सुरू केला आहे.

‘हॅलो स्किन’ हा व्हॉट्सअँप चॅटबॉट उपक्रम त्वचारोगाच्यारुग्णांसाठी योग्य सल्ला आणि त्वचारोगाबाबत जनजागृती निर्माण करण्यास उपयुक्त आहे.इतकेच नव्हे तर उपचार थेरपी संदर्भात कोणते औषध कधी घ्यायचे याचादेखील रुग्णांनावेळेची आठवण ते करून देईल. तसेच याबाबत काय काळजी घ्यायची याचाही सल्ला मिळेल. हेतंत्रज्ञान रुग्णांना हाताळण्यास सोयीचा असून हा चॅटबॉट हिंदी,इंग्रजी सह ६ स्थनिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

सध्या डर्मीटोफिटोसिस (रिंगवर्म) हा त्वचाविकार बळावलेला आहे. हा त्वचाविकार खूप संसर्गजन्य असून शरीराच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कुठेही गोल आकाराचा चट्टा येतो. देशात या आजाराचा सरासरी आकडा ७८. ४ टक्के इतका आहे. याआजारावर उपचार करणे फार आव्हानात्मक बनले आहे. या आजाराने पीडित असलेल्या रुग्णांना निराशा ही भावना तसेच एकटेपणा जाणवत आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल लिमिटेड चे ग्रुपचे अध्यक्ष व प्रमुख अलोक मलिक म्हणाले की आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञान अंतर्भाव करणे ही काळाची गरज आहे. हॅलो स्किन हा या उपक्रमाचा एक भागअसून त्याद्वारे रुग्णांना त्वचा विकार बाबत प्रशिक्षण देणे आणि उपचार थेरपी साठीमदत करणे हा त्याचा उद्देश आहे. ग्लेनमार्क ने हे नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे.या उपक्रमासाठी ग्लेनमार्क कडून त्वचाविकार संघटनेची मदत घेण्यात आली असूनत्यामुळे रुग्णांसाठी व त्वचाविकार तज्ज्ञासाठी साठी हा एक विश्वसनीय उपक्रम आहे

या नाविन्यपूर्ण उपक्रमाला पाठिंबा देत त्वचाविकार संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर रश्मी सरकार म्हणाल्या की त्वचाविकार उपचारांच्या व्यवस्थापनात रुग्णांना उपचार प्रक्रियेला चिटकून राहावे हा त्या मागचा उद्देश आहे. त्वचा विकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपचारांबाबत अधिक परिणामकारक मिळावी यासाठी हॅलो स्किन हाडिजिटल प्लॅटफॉर्म नक्कीच उपयुक्त ठरेल.

त्वचाविकार संघटनेचे प्रमुख डॉक्टर ललित गुप्ता म्हणाले की डर्मीटोफिटोसिस त्वचाविकार ज्याला रिंगवर्म असेही ओळखले जाते तो संर्गजन्य आजार आहे यातूनरुग्णामध्ये नैराश्य येत. हा आजार यशस्वीपणे बरा करण्यासाठी रुग्णांनी उपचारप्रक्रिया काटेकोरपणे पालन गरजेचे असते. डिजिटलायझेशन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून आणि हा चॅटबॉट नक्कीच रुग्णासाठी उपयुक्त ठरेल असा मला विश्वास आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading