Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

अपघाताची कारणे शोधली तरच अपघात कमी होतील – राजश्री गुंड

पुणे : रस्ता सुरक्षिततेबाबत जागृती करणेकरिता पीएमपीएमएल कडील चालकांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन व वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केल्याने पीएमपीएमएल चालकांना याचा नक्कीच फायदा होईल. तसेच चालकांनी अपघाताची कारणे शोधली तर अपघात कमी होतील; असे मत पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी व्यक्त केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चालकांसाठी दि. २४ मे ते  १ जून पर्यंत आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.)  सुबोध मेडसीकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक  अभिजीत वसगडे, चिफ मॅकेनिकल इंजिनीअर  सुनील बुरसे, चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) राजेश रूपनवर, झोनल मॅनेजर  सतिश गाटे, झोनल मॅनेजर  विक्रम शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीराजश्री गुंड म्हणाल्या, “पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बससेच्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी चालक सेवकांना पीएमपीएमएल ने सात दिवस प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांचेकडून चालकांना त्यांच्याकडून होणाऱ्या चुका कोणत्या अपघाताची कारणे कोणती व ती कशी टाळता येथील या करीता मार्गदर्शन करणार आहेत. तसेच चालकांनी अपघाताची कारणे शोधली तर अपघात कमी होतील.”
पीएमपीएमएलचे जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.) सुबोध मेडसीकर म्हणाले, “चालक हा समाजामधील नाक, कान व डोळे असुन चालकावरच पीएमपीएमएलची प्रतिमा तयार होते. तसेच चालक व वाहक यांनी लोकांना चांगली सेवा दिली तर त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा तयार होत असते त्यामुळे अधिकाऱ्यांचीही चांगली प्रतिमा तयार होत असते.”
यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अभिजीत वसगडे यांनी चित्रफितद्वारे रोडमार्किंग, ट्रॅफिक सिग्नलचे प्रकार, ट्रॅफिकचे नियम मोडल्यास किती दंड व शिक्षा असते या बाबतची माहिती दिली. तसेच अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी या बाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक झोनल मॅनेजर सतिश गाटे यांनी केले तर आभार जनरल मॅनेजर (अॅडमिन अॅण्ड एच.आर.)  सुबोध मेडसीकर यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading