Wednesday, June 3, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार

मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे ‘माहिती भवन’ प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे हस्तांतरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालो, त्यामुळे पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाईपसेटिंगपासून मोबाईलपर्यंतचा पत्रकारितेचा प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात, त्या बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे खुलासे होणे आवश्यक आहे.

असे आहे माहिती भवन…

● नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माहिती भवन

● सिडको इमारतीच्या सुमारे ६ हजार ८८३ चौरस फुट क्षेत्रफळाच्या भव्य जागेत माहिती भवन सुरु होणार.

● तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या इमारतीत कॉन्फरन्स रुम, कार्यालये, बहुद्देशीय सभागृह, अतिथी कक्ष, प्रतिक्षा कक्ष, स्वयंपाकघर, वाहनतळ आदी सुविधा.

● इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २.५८ कोटी रुपये खर्च.

● अद्ययावत स्टुडिओ, लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा, राज्यस्तरीय माध्यम प्रशिक्षण केंद्र, पत्रकार कक्ष, ग्रंथालय, डिजिटल ग्रंथालय, विविध प्रकाशनांचे दालन, प्रदर्शन दालन, दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, दुर्मिळ दृकश्राव्य दालन, समाजमाध्यम कक्ष, पत्रकार परिषद कक्ष, माध्यम प्रतिसाद केंद्र आदींचा माहिती भवनात समावेश

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading