आता राज्यानेही केली पेट्रोल – डिझेलच्या दरात कपात

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. राज्यसरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 08 पैसे तर डिझेलच्या दरात 1 रुपया 44 पैशांची कपात केली आहे.

शनिवारी केंद्र सरकराने अबकारी कर कमी करत पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची कपात केली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्य सरकारांना करात कपात करण्याची विनंती केली होती. त्यानंतर केरळ आणि राजस्थान सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला. दरम्यान, महाराष्ट्रात इंधनावरील करामुळे पेट्रोल आणि डिझेल शेजारच्या राज्यांपेक्षा तुलनेनं महाग मिळतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही कर कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी होत होती. त्यानंतर आज राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या करात सूट जाहीर केली. त्यामुळे आता पेट्रोल 2.08 तर डिझेल 1.44 रुपयांनी स्वस्त होईल.

कर कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 95 रुपये 84 पैसे प्रतिलिटर दराने मिळेल. दरम्यान, राज्य सरकारच्या कर कमी करण्याच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: