महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने भोंगा लावून आंदोलन

पुणे: मोदी सरकारने केलेल्या अन्यायकारक पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने महागाईचा भोंगा लावून स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आले.युवक अध्यक्ष पुणे शहर किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रविकांतजी वर्पे , प्रवक्ते प्रदीप देशमुख , राकेश कामठे ,अजित घुले सरचिटणीस युवक प्रदेश, अजिंक्य पालकर शहर कार्याध्यक्ष, मनोज पाचपुते शहर कार्याध्यक्ष,अमोल ननावरे,आनंद सगरे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनाच्या वेळी रविकांतजी वर्पे म्हणाले, महानगरपालिकागर निवडणूका या जवळ आल्या तरी मोदी सरकार महागाई कमी करत नाही. त्यामुळे आज भोंगा लावून आंदोलन करण्याची वेळ आली आहे .याला मोदी सरकार जबाबदार आहे. जर मोदी सरकारने महागाई कमी केले नाही तर येथील पुढील काळात भोंगा लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा रविकांत वर्पे यांनी दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: