राजीव गांधींच्या ‘संगणक क्रांती’मुळे शिक्षण क्षेत्राचा देखील मोठा विस्तार – डॉ. शिवाजीराव कदम

पुणे :स्व राजीव गांधींच्या ‘माहीती-तंत्रज्ञान, विज्ञान व संगणक क्रांती’मुळेच शैक्षणीक क्षेत्रात विस्तार झपाट्याने झाला असून, त्याचे श्रेय स्व राजीवजी गांधी यांनाच जाते असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कुलपती डॅा शिवाजीराव कदम यांनी त्यांचे ३१ व्या स्मृतीदीन प्रसंगी केले..!

स्व राजीव गांधी स्मारक समीती तर्फे कात्रज प्राणी संग्रहालय येथील त्यांचे पुतळ्यास डॅा कदम व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.. या प्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सर्वश्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, प्राणी संग्रहालयाच्या ऊपसंचालीका डॅा. सुचित्रा सुर्यवंशी(पाटील) इ ऊपस्थित होते.. संयोजक व राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी यांनी प्रास्ताविक केले…!
दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांचे रूपाने देशाने द्रष्टा कर्तबगार नेता, खिलाडूवृत्ती व औदार्याचे मुर्तीमंत ऊदाहरण असलेला व लोकशाही मुल्ये जपणारा प्रधानमंत्री गमावल्याचे शल्य भारतीयांच्या मनांत कायम राहील असे ऊदगार राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप यांनी अभिवादनपर व्यक्त केले..
मानवतादी, निरागस व ऊमदे पंतप्रधान राजीव जी गांधी यांचे योगदान देश कदापी विसरू शकत नाही व डीजीटल इंडीयाची पायाभरणी ही राजीव गांधींनीच केल्याचे सत्य नाकारता येणार नाही असे मत काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले*..
*स्वातंत्र्योत्तर भारतात’ अयोध्येतील राम मंदीराचा वाद हा पुर्वापार चालत आला होता.. परंतू तत्कालीन पंतप्रधान स्व राजीव गांधी यांनीच सर्वप्रथम राम मंदीराचे दरवाजे ऊघडून, शिला न्यास घडवून, ‘रामलल्लाचे दर्शन भारतीयांना घडवले.. हा ईतिहास विसरू शकत नाही त्यामुळे रामल्ला चे स्वातंत्र्योत्तर भारतीयांना सर्वप्रथम दर्शन घडवण्याचे श्रेय’ हे सर्वस्वी स्व राजीव गांधी यांनाच जाते* असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमूख संजय मोरे यांनी आयोजीत पुष्पांजली – अभिवादन प्रसंगी केले*..

स्मारक समिती तर्फे राजीव जगताप, सुर्यकांत मारणे, राजेंद्र खराडे, सुभाष थोरवे, संजय अभंग, सुरेश ऊकीरंडे, सौ ज्योती परदेशी यांनी ऊपस्थितांचे तुळशीचे रोप व तिरंगा मफलर देऊन सत्कार केला.. भोला वांजळे यांनी आभार प्रदर्शन केले.. या प्रसंगी .. सर्वश्री प्रसन्न पाटील, शिवाजी भोईटे, नरसिंह अंदोली, अजय अनिवसे, अशोक काळे, देवराज इंदूलकर, बाळासाहेब प्रताप, दत्तोबा जाधव इ कार्यकर्ते ऊपस्थित होते..

Leave a Reply

%d bloggers like this: