fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ ला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– 26 हजारांहून अधिक पुणेकरांनी दिली भेट
पुणे :  वॉटर कलर, म्युरल, चारकोल, ग्लासपेटींग, पोट्रेट, पोस्टर कलर, ऑइल कलर, सिरॅमीक, अॅकरॅलीक, स्क्लपचर, कॅलिग्राफी अशा विविध प्रकारच्या आधुनिक व पारंपारीक चित्र, शिल्पांचा मेळ असलेल्या  ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’ नुकताच शुभारंभ लॉन्स, पुणे येथे संपन्न झाला. या ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो’मध्ये 400 हून अधिक चित्रकार सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्रासह कलकत्ता, चेन्नई, चंदीगड, मेरठ, गुजरात, वेस्ट बंगाल तसेच सिंगापूर आणि दुबई येथील कलाकारांचा सहभाग होता.
या चार दिवसीय ‘इंटरनॅशनल आर्ट एक्स्पो पुणे’ विषयी बोलताना आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर म्हणाले, कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी असे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामुळे कलाकारांसह नागरिकांनाही या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. कलाकारांमधील जी दोन वर्षात मरगळ आली होती ती कमी झाली. ही समाधानकारक बाब आहे. आगामी काळातही असे प्रदर्शन भरवण्याचा आमचा प्रयत्न असेल.
या प्रदर्शनासाठी आर्टक्यूब गॅलेरियाचे अतुल काटकर, प्रमोद माने, कॅमल चे झोनल बिजनेस मॅनेजर नंदकुमार गायकवाड, ग्राफीनेट सोल्युशनचे चेतन मोरे आदींनी काम पाहिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading