राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : राज्यस्तरीय कनिष्ठ महाविद्यालय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हे १९ ते २० मे २०२२ रोजी पाचगणी – महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील हिंदी भाषाचे उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन या सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. राज्यभरातील किमान २०० शिक्षक या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते केले जाईल. तर या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रो.डॉ.अर्जुन चव्हाण हे असतील. या कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने हिंदी शिक्षकांची भूमिका तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष निमित्ताने शिक्षण संघटनाचे योगदान या विषयांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत . तसेच हिंदी काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजनही या सोहळ्यात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त शिक्षण अधिकारी अनिल गुंजाळ, पांचगणीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष लक्ष्मीताई कऱ्हाडकर, समाजसेवक नितीन भिलारे, पांचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, सचिव प्रा.रेवणनाथ कर्डिले,राज्य सल्लागार प्रा.संजय पवार यांनी दिली.
