माजी सैनिक संघटनेच्या राज्य सल्लागारपदी दिलावर शादीवान
पुणे : शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या राज्य सल्लागारपदावर दिलावर शादीवान(पुणे )यांची नियुक्ती झाली आहे.सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशन आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रदेशाध्यक्ष बाजीराव देशमुख यांनी जाहीर केले.तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते त्यांना संघटना भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नौदलातून निवृत्त झाल्यावर दिलावर शादीवान हे पनवेल महानगरपालिकेत वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत .शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या राज्य सल्लागारपदावर नियुक्तीबद्दल त्यांचे पुणे जिल्हा कार्यकारिणीकडून अभिनंदन करण्यात आले.
