Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विनायक आंबेकर मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर मारहाण प्रकरण  

पुणे : फेसबुकवर शरद पवार  यांच्या विरोधात पोस्ट केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजप प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप आरोपींपैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांविरूद्ध भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम ५०४, ३२३ अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading