Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

संगीत शिक्षण घेणाऱ्यांसाठी कोविड काळात केलेल्या मदतकार्यासाठी मित्र फाउंडेशनचा गौरव

पुणे : तालयोगी आश्रमाच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त तालयात्रा या विशेष कार्यक्रमाचे गेल्या शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालयोगी पं सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांनी सांगितीक कार्यक्रम सादर केले. तसेच कोविड काळात केलेल्या मदतकार्याची दखल घेत मित्र फाउंडेशनचा पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मित्र फाउंडेशनचे विश्वस्त धनंजय गोखले यांनी हा गौरव स्वीकारला.

संगीत शिक्षण घेणाऱ्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांना मित्र फाउंडेशनने कोविड काळात प्रत्येकी रु. ५००० (रुपये पाच हजार) अशी आर्थिक मदत केली होती. या मदतीमुळे या विद्यार्थ्यांना कोविड काळात आधार मिळाला होता. तसेच फाउंडेशनतर्फे या काळात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रमही राबविण्यात आले. या कार्याची दखल घेत फाउंडेशनचा गौरव करण्यात आला. मित्र फाउंडेशनचे सदस्यांचा पाठिंबा आणि डॉ. एस. व्ही. गोखले, भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असल्याची भावना धनंजय गोखले यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading