‘पैग़ाम-ए-अमन’ सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरी झाली रमज़ान ईद
पुणे : आपल्या देशाला संतांची परंपरा लाभलेली आहे. समाज सुधारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय, मानवता, समता, लोकशाही या मूल्यांमध्ये बांधून आपला विखुरलेला देश एक केला. आज काही शक्ती हा देश पुन्हा तोडायचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत ईद मिलन सारखे सण सर्वांनी एकत्र येऊन साजरे करण ही काळाची पण गरज आहे, असे परखड मत रमजान ईद निमित्त पैगाम ए अमन या सांस्कृतिक कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. उल्हास दादा पवार यांनी मांडले.
ॲड. अभय छाजेड व लोकायत संघटनेने हा कार्यक्रम रविवारी (8 मे) आयोजित केला होता. समाजामध्ये एकसंघता आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सण साजरे करण या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं अस मत ॲड. अभय छाजेड यांनी केलं. मै खीर तू शीरकुर्मा, खरा तो एकाची धर्म या गाण्यानी कार्यक्रमाची सुरवात झाली. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, निवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील, युक्रांत व मुस्लिम सत्यशोधक मंचाचे अन्वर राजन, आझम कॉलेजचे संस्थापक डॉ. पी.ए.इनामदार, लोकायतचे निरज जैन, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शहर बागवे राज्य काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, नीता परदेशी, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, राष्ट्रवादी पक्षाचे संतोष नागरे, बाळासाहेब माळवदकर उपस्थित होते. सर्वांनी शिरकुर्माचा आस्वाद घेत कार्यक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन अलका जोशी यांनी केले.
