पुण्याचे नवनियुक्त पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक यांचे गणपती मंडळांच्या वतीने स्वागत
पुणे : पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस सहआयुक्त संदीप कर्णीक यांचे स्वागत पुणे शहराचे अष्टविनायक गणपती मंडळांच्या वतीने करण्यात आले. यावेळी पुण्यातील प्रमुख गणपती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आपल्या अष्टविनायक गणपती मंडळांचे मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांतजी शेटे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे प्रशांत टिकार,, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे राजूशेठ परदेशी,राजेंद्र मरळ मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाचे अनिलजी सकपाळ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष संजीवजी जावळे, उत्सव प्रमुख पुनितदादा बालन, अखिल मंडई मंडळाचे संजयजी मते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे उपाध्यक्ष सुनिलभाऊ रासने, कोषाध्यक्ष महेशभाऊ सुर्यवंशी उपस्थित होते. श्रीकांतजी शेटे यांनी कोवीड मधील गणेश मंडळांच्या कार्याविषयी तर महेशभाऊ सुर्यवंशी यांनी गणेशोत्सवातील मंडळांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली.
संदिप कर्णीक यांनी मुंबईत गणेशोत्सव काळात काम केल्याचे नमूद केले. तसेच यंदाचा पुण्याचा गणेशोत्सव परंपरेनुसार करताना मंडळ व प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून अधिकाधिक चांगल्या प्रकारे उत्साहात साजरा करु असेही ते म्हणाले.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विशेष शाखा पुणे शहर आर. राजा, पोलीस उपायुक्त गुन्हे पुणे शहर श्रीनिवास घाडगे, वाहतूक पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे आदी उपस्थित होते. गेले दोन वर्षे कोवीड च्या परिस्थितीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला गेला पण यंदाच्या वर्षी कोणतेही विघ्न न येता नेहमीच्याच उत्साहात, जल्लोषात परंपरेप्रमाणे साजरा होईल हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
