Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

महाआरती नंतर वसंत मोरे मुस्लिम पदाधिकार्‍यांच्या घरी जेवायला

पुणे : वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये महाआरतीचे आयोजन केले होते. राज ठाकरे पुण्यामध्ये असूनही वसंत मोरे यांच्या महाआरतीला उपस्थीत राहिले नव्हते. आता वसंत मोरे यांनी महाआरतीनंतर मुस्लीम पदाधिकाऱ्याच्या घरी जावून जेवन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेज शेख यांच्या जावून वसंत मोरे यांनी जेवनाचा आस्वाद घेतला. मनसेचे इतर कार्यकर्तेही मोरेंच्या सोबत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माशिदीवरील भोंग्या विरोधी आंदोलनानंतर, मनसे नेते वसंत मोरे यांनी ईद साजरी केली आहे. मुस्लीम पदाधिाऱ्यांच्या भेटीचे फोटो वसंत मोरे यांनी आपल्या फेसबुक फेजवर शेअर केले आहे.

या वेळी मनसेचे वाहतूक सेनेने शहर सरचिटणीस आवेज भाई शेख यांच्या घरी ही मेजवानी झाली. याबाबत मोरेंनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे पुणे शहर सरचिटणीस आवेजभाई शेख यांचे घरी जेवण केले. सोबत सुनील अंधारे पुणे शहर वाहतूक उपाध्यक्ष, शाखा अध्यक्ष अमितआण्णा जगताप, शाखा अध्यक्ष मंगेश रासकर होते. परिसरातील बरेच नागरिकही उपस्थित होते.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02Eqxt77U4LJum5eQd6c3MhCLuPZJ3MJsujcTWbeGjuLduKcmUpwsTbW12NEMrkf1ol&id=100002277631739&sfnsn=wiwspwa

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading