गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या, BJP हटाओ देश बचाओ
पुणे :दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीदेखील ट्वीट करत भाजपसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला. चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे, गॅस मध्येच भरमसाठ वाढ झाली. परत चुलीकडे जावेच लागणार,पोटाचा प्रश्न आहे ना. कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र #Shame #BJP_हटाओ देश बचायो”, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
महागाईचा भोंगा वाजला 50 रुपयाने गॅस वाढला .
चूल सोडून गॅस वापरा म्हणणारे ,गॅस मध्येच भरमसाठ वाढ झाली.
परत चुलीकडे जावेच लागणार,पोटाचा प्रश्न आहे ना.
कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र#Shame #BJP_हटाओ_देश_बचायो .— Rupalipatilthombare (@Rupalispeak) May 7, 2022
