मुंबई ऑन्कोकेअर कोल्हापूर शाखेचे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापुर : मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर अद्ययावत उपचार करणाऱ्या डे-केअर साखळीस्वरुप संस्थेच्या कोल्हापुर शाखेचा उद्‌घाटन सोहळा महाराष्टरदिनी अभिनेते व दिग्दर्शक डॉ. गिरीश ओक यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी सायन हॉस्पिटलच्या मेडिसीन विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. नितीन कर्णिक, तसेच मुंबई ऑन्कोकेअरचे संचालक डॉ. आशिष जोशी, डॉ. वशिष्ठ मणियार, डॉ. प्रितम कळसकर आणि डॉ. क्षितीज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

“मुंबई ऑन्कोकेअर या कर्करोगांवर जागतिक दर्जाचे उपचार वाजवी दरात उपलब्ध करुन देणाऱ्या, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या संस्थेचं कोल्हापुरात आगमन झालयं याचा मला अतिशय आनंद होत आहे”, असं डॉ. गिरीष ओक उद्‌घाटनप्रसंगी म्हणाले. मोठ्या शहरांमध्ये उपचारांच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध असतात परंतू छोट्या शहरांतील रुग्णांकरीता अशी कर्करोगावर अद्ययावत उपचार करणारी सुविधा उपलब्ध करुन देण्याचं आणि तिथल्या रुग्णांना शहरांपर्यंत येण्याचा त्रास वाचण्याचं एक महत्त्वपुर्ण काम मुंबई ऑन्कोकेअरने केलयं; असही डॉ. ओक म्हणाले. डॉ. नितीन कर्णिक यांनी मुंबई ऑन्कोकेअरचे प्रमुख कर्करोगतज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांचे उद्‌घाटनप्रसंगी अभिनंदन केले.

डॉ.अक्षय शिवछंद यांनी कोल्हापुरातील कर्करोगग्रस्तांना उच्चशिक्षित कर्करोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, सुरक्षित वातावरणात व वाजवी दरात उपचार उपलब्ध होतील असे आश्वसनही दिले. मुंबई ॲान्कोकेअरचे कॅन्सर डे-केअर ही एक वेगळी संकल्पना आहे. ९०% केमोथेरपी या रुग्णांना डे-केअर तत्वावर देता येतात आणि त्याकरीता रुग्णांना २४ तास हॉस्पिटल ॲडमिशनची आवश्यकता नसते. त्यामुळे रुग्णांचा ‘ट्रीटमेंट कंप्लायंस’ वाढतो. वेळेच्या आणि खर्चाच्या दृष्टिने कर्करोगग्रस्तांसाठी ही फारच दिलासादायक बाब आहे असंही डॉ. अक्षय शिवछंद आमच्या पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: