गुरूवारी पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
पुणे : वडगाव जलकेंद्र तसेच विमाननगर धानोरी येथील पंपींग स्टेशनवर गुरूवारी (दि. 5) तातडीचे विद्युत व स्थापत्य विषयक काम करायचे आहे. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा केला जार आहे, अशी माहिती महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :
वडगाव जलकेंद्र परिसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव,धायरी,आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक
विमाननगर टाकी परिसर – संजय पार्क, संपुर्ण विमाननगर, म्हाडा कॅलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुना नगर,दत्त मंदिर परिसर धानोरी टाकी परिसर – कमल पार्क, माधव नगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनाथ, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिध्दार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी,हरिकृष्ण पार्क
