Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

हर्षदाच्या ‘सुवर्ण’ कामगिरीचा देशाला अभिमान – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, हर्षदाच्या सुवर्ण कामगिरीचा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. ग्रीस-हेरकिलॉन येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत हर्षदाने देशासाठी पाहिले सुवर्णपदक जिंकले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमधील हर्षदाने देशाच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला असून तिच्या या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading