जिथे जिथे अनधिकृत भोंगे तिथे तिथे हनुमान चालिसा लावा – राज ठाकरे
मुंबई : राज्यातील मशिदीवरचे भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला देलेला अल्टीमेटम आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून कार्यकर्त्यांना भोंग्यांविरोधातील आंदोलन कायदेशीर मार्गाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. “आपल्याला दंगल घडवायची नाही. पण जिथे अनधिकृतपणे भोंग्यांवरून अजान, बांग सुरू असेल तिथे तिथे हनुमान चालिसा लावा. त्यांनाही कळू दे त्रास काय असतो”, असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात लिहिले आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रकातील मुद्दे –
- भोंग्यांवर बांग ऐकू येताच पोलिसांना फोन करुन तक्रारी द्या, रोज फोन करा
- मंदिरावर भोंगे लावण्यासाठी पोलिसांची परवानगी मागा
- त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा
- सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी, स्वाक्षऱ्यांचे निवेदन रोज पोलिस ठाण्यात नेऊन द्या
- ज्या मशिदीतील अनधिकृत भोंगे काढण्यात आले असतील त्या मशिदींना त्रास होणार नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी घ्यावी
- जर ते धर्मांधपणा सोडणार नसतील तर आपणही धर्महट्टा सोडणार नाही
सर्वांना आवाहन pic.twitter.com/SNgxd2GMTA
— Raj Thackeray (@RajThackeray) May 3, 2022