बसपा पुणे जिल्हा कामगार आघाडी च्या अध्यक्षपदी प्रीतम धारिया यांची निवड

पुणे : बहुजन समाज पार्टी पुणे जिल्ह्याच्या वतीने एक मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी पुणे जिल्हा कामगार आघाडीचे गठन करण्यात आले आहे. व बसपा पुणे जिल्हा कामगार आघाडी च्या अध्यक्षपदी प्रीतम धारिया यांची निवड करण्यात आली. 

पुणे जिल्हा कामगार आघाडीच्या माध्यमांमधून पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगार, बांधकाम मजूर, खाजगी नोकरदार, रोजंदारी कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात कामगारांना संघटित करून भारतीय संविधानाने दिलेल्या कामगारांचे अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी, कामगारांचे प्रश्न संघटितरीत्या सोडविण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये कामगार आघाडी कार्य करणार आहे अशी भूमिका महाराष्ट्र राज्याचे प्रभारी बसपाचे माननीय हुलगेश चलवादी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. पुणे जिल्ह्याचे प्रभारी रमेश गायकवाड, कामगारांच्या मुलांसाठीअहोरात्र संघर्ष करणारे माननीय वांजळे साहेब व विविध कामगार संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते भविष्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून बहुजन समाज पार्टी कामगार आघाडी कार्यरत असेल असा विश्वास अध्यक्षपदी नेमणूक केलेले प्रीतम धारिया यांनी व्यक्त केला. कामगार दिनाचे औचित्य साधून आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

Leave a Reply

%d bloggers like this: