राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबादकडे निघाले आहेत. ३० ते ४० गाड्यांचा ताफा घेऊन राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. पण त्यांचा ताफ्यातील गाड्यांचे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात सात आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचेही अपघात झाले आहे. 

दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी सुखरूप आहेत. या अपघातात केदार शिंदे, अंकुश चौधरी यांना कसली इजा झाली नसली तरी त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. काळजी करण्याचे कसलेही कारण नाही, असे अंकुश चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विशेष म्हणजे, आज हा ताफ्याचा दुसरा अपघात आहे. पुण्यावरून येताना काही गाड्या एकमेकांवर आदळल्या होत्या. त्यानंतर हा अपघात घडून आला. पुण्यावरून निघाल्यानंतर या सर्व गाड्या हायवेवरून अतिशय वेगाने येत होत्या. औरंगाबाद पासून अगदी २० किलोमीटर अंतरावर असताना या गाड्यांचा अपघात झाला. समोरचं गाड्यांनी एकदमच ब्रेक मारल्याने पाठीमागून येणाऱ्या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामुळे हा अपघात घडून आला.

Leave a Reply

%d bloggers like this: