Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

एकनाथ ढोले यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

पुणे:शिवसेने मधील एकनाथ ढोले यांनीआम आदमी पक्षात प्रवेश केला आहे .तेशिवसेनेमध्ये गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभाग प्रमुख, विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.एकनाथ ढोले हे गेली ३२ वर्षांपासून शिवसेनेचे सक्रीय पदाधिकारी होते.तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष होते.त्यांनी २०१७ साली शिवसेनेकडून पुणे मनपा निवडणूक लढवली आहे.
आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.एकनाथ ढोले यांची पुणे शहर संघटक पदी नियुक्ती केली आहे. पक्ष प्रवेशावेळी यावेळी राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ अभिजित मोरे, पुणे शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, पुणे शहर निवडणूक प्रचार प्रशासन समितीचे सुदर्शन जगदाळे, विकास सुपणार, पियूष हिंगणे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading