सुभाष दळवी यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट
मुंबई – मुंबई महानगर पालिका, घन कचरा व्यवस्थापन विभागाचे विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी, यांना “कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी” (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका) कडून “पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत घनकचरा व्यवस्थापनात ” या विषयात नुकतीच ” मानद डॉक्टरेट “(डी. लिट), ही मानाची पदवी बहाल केली आहे. ही पदवी प्राप्त करणारे श्री.दळवी हे महानगरपालिकेतील पाहिले अधिकारी आहेत.
दळवी यांनी यापुर्वी मुंबई विद्यापीठ येथून बांधकाम व्यवस्थापन क्षेत्रातील मास्टर इन सिव्हिल इंजिनिअर ही पदवी प्राप्त केली आहे . दळवी, हे भारत सरकारच्या “राष्ट्रीय युवा पुरस्कार” आणि युनायटेड नेशन्सच्या “डिकेड्स ऑफ सस्टेनेबल एनर्जी” तसेच “पर्यावरण रत्न” या सारख्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. दळवी यांनी 1997-98 मध्ये लोकसहभागातून तीन महिन्यांत अस्वच्छ धारावीचे “स्वच्छ परिसर” मध्ये रूपांतर करून आपले नेतृत्व सिद्ध केले. भारत सरकारने लोकसहभागातून आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी “धारावी” चे परिवर्तन करण्याच्या दळवी यांच्या नेतृत्वावर “धारावी – एक नवी पहाट – NM – 380 ” या नावाने एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली.
दळवी, हे “संत गाडगे बाबा त्रिसूत्री योजना” (स्वच्छता, आरोग्य आणि स्वयंरोजगार) तसेच नाविन्यपूर्ण अशा “तीन चाकी – कचरा संकलन प्रणाली” यासारख्या विविध स्वच्छ मुंबई प्रकल्पांचे प्रणेते आहेत.
दळवी यांनी , ” घनकचरा वर्गीकरण, ” कचरा वेचक चळवळीद्वारे “सुका कचरा संकलन” , वर्मी कल्चर तसेच बायो कल्चर स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम आणी सेंद्रीय शेती प्रकल्प , तसेच लोकसहभागातून विलेपार्ले (पूर्व) परिसरात “प्लास्टिक पिशवीचा मोह टाळा ” (प्लास्टिक कॅरी बॅगला नाही म्हणा) ही चळवळ आणि असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.
दळवी यांच्या संकल्पनेतून “स्मार्ट वर्मी कंपोस्ट सिस्टीम आणि सेंद्रिय शेती प्रकल्प” हा ” निसर्गाचे निसर्गाला परत करा ” या संकल्पनेतील प्रकल्प कूपर हॉस्पिटल , विलेपार्ले ( वेस्ट ), मुंबई , एसएनडीटी जुहू कॅम्पस, राणी बाग प्राणी संग्राहालय , सरकारी वसाहत , वांद्रे (पूर्व) येथे यशस्वीपणे राविण्यात येत आहे.
दळवी हे “स्मार्ट बायो कंपोस्ट सिस्टीम” चे सुद्धा प्रणेते आहेत . हा प्रकल्प कुलाबा येथील भारतीय नौदलाच्या “नोफ्रा” भागात आणि जोगेश्वरी (पूर्व) मध्ये JVLR वर ग्रीनफिल्ड सोसायटी येथे यशस्वीपणे राविण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील विद्यानगरी कॅम्पसमध्ये “स्मार्ट वर्मी कंपोस्ट सिस्टीम आणि सेंद्रिय शेती प्रकल्प” चे सध्या काम सुरू आहे.
