Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

राज ठाकरे यांना भोंग्यामुळे त्रास होतोय तर भोंगे, स्पीकर शिवाय सभा करा- हलिमा शेख

पुणे :  जर भोंगे, स्पीकर मुळे राज ठाकरे यांना त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकर शिवाय सभा करावी. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जिम्मेदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग, प्रदेश संघटक सचीव हलिमाताई शेख यांनी केले.

औरंगाबाद येथील मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला पोलीसांनी सशर्त परवानगी दिली असली तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी जर सभेत किंवा सभेनंतर अणूचीत प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्यक विभाग राज्यभर निषेधार्थ तीव्र मोर्चा काढेल असा इशारा देऊन हलिमा शेख यांनी जनतेला सभेला जाऊ नये असे आवाहन देखील केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading