राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर,राजकीय चर्चेला उधाण

पुणे: राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर येणार आहेत. आज सकाळी 10 वाजता ते पुण्याला रवाना होणार आहेत. राज ठाकरेंची 1 मे ला औरंगाबादमध्ये सभा होणार आहे त्याआधीच ते आज पुण्यात येत आहेत,त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. राजपाडव्याला राज ठाकरे यांनी भोंग्याणा विरोध केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे पर्यंत चा अल्टिमेटम दिला आहे. आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झाले. 3 मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. परंतु, त्यापुर्वी राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुण्यात असणार आहेत. औरंगाबादच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून 30 एप्रिलला रवाना होणार आहेत. दरम्यान, 30 एप्रिलला पुण्यात संध्याकाळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची निर्धार सभा देखील आहे.

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरेंवर जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यातील राजकारण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा जाहीर केला आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 29, 30 एप्रिल रोजी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. औरंगाबादच्या सभेला पुण्यातून राज ठाकरे होणार रवाना होणार आहेत. इतकंच नाही तर 3 मे रोजी होणाऱ्या महाआरतीसंदर्भात देखील नियोजन करण्यात आलेले आहे. महाआरतीसाठी परवानगी देण्यासाठी शहरातील पोलीस स्टेशन मध्ये पत्र देण्याचे काम सुरु आहे. मनसे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: