Saturday, April 4, 2026
Latest NewsPUNE

रमणबाग प्रशालेच्या मुख्य प्रवशेद्वराचे नूतनीकरण

पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या २००२ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा प्रशालेत झाला. २० वर्षांपूर्वी ssc परीक्षेला बसलेले १२० विद्यार्थी आणि त्यावेळी शिकवणारे २० शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते. शाळा आणि गुरूजनांना कृतज्ञता भेट देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील शिवले, माजी मुख्याध्यापक श्री काकडे याचबरोबर आजी व माजी शिक्षक १२० माझी विद्यार्थी प्रत्यक्ष मेळाव्याला उपस्थित होते.
शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व बॅच ने मिळून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी आवश्यक असलेला निधी गोळा करायचे एकत्रितपणे ठरवले आहे.
शिकवणारे गुरूजन आणि शिक्षकेतर सेवक वर्गाचा कृतज्ञता गौरव करण्यात आला.

विविध क्षेत्रात नैपुण्य पूर्ण कामगिरी केलेल्या विद्याथ्र्यांचा सत्कार ह्यावेळी करण्यात आला. शाळेतील माजी व आजी शिक्षकांचा सत्कार विद्यार्थी प्रतिनिधींनी केला. प्रार्थना ते अल्पोपहार अशा जवळपास दोन तास झालेल्या या कार्यक्रमानंतर वेगवेगळ्या समुहाने हे माजीविद्यार्थी प्रशालेच्या प्रांगणात रमले होते.

मुख्याध्यापक सुनील शिवले,तत्कालीन मुख्याध्यापक काकडे सर, महेश जोशी सर, जक्का मॅडम, विद्यार्थी प्रतिनिधी संदेश काथवटे, सुकुमार अतिक आदींनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधिका देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी अश्विन देवळणकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading