Friday, June 5, 2026
BusinessLatest News

पिकांच्या संरक्षणासाठी ‘आयजी आत्रेयास’ची स्थापना

मुंबई : भारतातील फळआयातीच्या क्षेत्रातील काही अग्रगण्य कंपन्यांपैकी एक कंपनी आयजी इंटरनॅशनलने शेड नेट हाऊसेस आणि टनेल यंत्रणेच्या विपुल पर्यायांच्या माध्यमातून संरक्षित लागवड व्यवस्था निर्माण करण्याच्या क्षेत्रातील प्रमुख कंपनी आत्रेग्रीनच्या साथीने एक संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. या भागीदारीद्वारे टनेल यंत्रणा उत्पादन क्षेत्रातील टनेल यंत्रणेचा सर्वात मोठा पुरवठादार ठरू शकेल असा आयजी आत्रेयास नावाचा एक समोद्देशी स्थापन केला जाईल. वर्ष २०२४ पर्यंत १०० कोटी रुपयांच्या महसुलाचा टप्पा गाठण्याचे या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीचे लक्ष्य असेल तसेच परदेशांतील बाजारपेठांतही प्रवेश करण्याचे ध्येयही या कंपनीने आखले आहे.

आत्रेग्रीनने एक कंपनी म्हणून टनेल शेतीच्या सोयीसाठी शेड नेट हाऊसेसच्या अनेक प्रकारे उपयुक्त उत्पादनाच्या साथीने शेती आणि संरक्षित लागवड पद्धतींच्या रूढ पद्धतींना आव्हान देत अशाप्रकारच्या शेतीची व्याख्या नव्याने रचली आहे. लागवडीखालील भूभागाला व्यापू शकतील अशी टनेल्स, टनेल कव्हर्स आणि नेट हाऊसेस व गार्डन टनेल्स या आपल्या अनेक अर्थांनी उपयुक्त उत्पादनांच्या माध्यमातून शेतीमधील अनिश्चिततेची समस्या दूर करण्याचे काम आत्रेग्रीन करू पाहत आहे. ही उत्पादने शेतक-यांना वाजवी दरात उपलब्ध, उच्च क्षमतेच्या, अव्वल दर्जाच्या संरक्षित लागवड उत्पादनांसह सुसज्ज करत आहेत, ज्यातून पिक घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक नियमितपणा आला आहे.

आयजी इंटरनॅशनल प्रा. लि. चे संचालक संजय अरोरा म्हणाले, “या भागीदारीमुळे आम्ही हवामान बदलाचे पिकांवर होणारे परिणाम दूर करण्यासाठी आवश्यक अशी कालसुसंगत उत्पादने आणि साधने शेतक-यांना पुरवू शकू. आत्रेग्रीन ही कंपनी प्रदीर्घ काळापासून संरक्षित लागवड क्षेत्रामध्ये आघाडीवर राहून काम करत आहे. त्यांचा अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आमच्याही मुलभूत विचारांशी मेळ साधणारा आहे. आपल्या क्षेत्रातील नेतृत्व स्थानापर्यंत पोहोचणे आणि आपल्या ग्राहकांना केवळ उत्तम तेच पुरविणे हे आयजी आत्रेयासचे ध्येय असणार आहे.”

आत्रेयास अॅग्रो कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन महेंद्रभाई मकानी म्हणाले. “आयजी आत्रेयासच्या माध्यमातून आम्ही पिक घेण्याच्या अधिक चांगल्या पद्धतींना चालना देऊ शकू, अशी आम्हाला आशा आहे. या पद्धती उत्पादकांच्या फायद्याच्या तर असतीलच पण त्याचबरोबर आमच्या आश्रयदात्या ग्राहकवर्गाला उत्तम दर्जाच्या ताज्या उत्पादनांचा आस्वाद घेता येईल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading