ट्रिनिटी स्पोर्टस् अॅकॅडमी तर्फे महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी मोफत निवड चाचणी शिबीराचे आयोजन
पुणे : ट्रिनिटी स्पोर्टस् अॅकॅडमी तर्फे महाराष्ट्रातील गुणवान खेळाडूंसाठी मोफत निवड चाचणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे निवड चाचणी शिबीर २८ एप्रिल ते ४ मे २०२२ या कालावधीमध्ये ट्रिनिटी स्पोर्टस् अॅकॅडमी, येवलेवाडी येथील मैदानावर होणार आहे.
याबाबत अधिक माहिती सांगताना के. जे. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संचालक विनोद जाधव आणि अॅकॅडमीचे प्रशासक सौरभ जगदाळे यांनी सांगितले की, करोना संकंटामुळे गेले दोन वर्ष अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे. अनेक खेळाडूंच्या संधी चुकल्या गेल्या तर, अनेकांना सोयी-सुविधा मिळण्यास कठीण गेले. सर्वांचेच आयुष्य आता पुर्वपदावर येत असून यावेळी गुणवान आणि युवा खेळाडूंना संधी मिळावी, या उद्देशाने हे शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये १४, १६ आणि १९ वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.
निवड चाचणी शिबीरामधून अंतिम निवड झालेल्या खेळाडूंना ट्रिनिटी स्पोर्टस् अॅकॅडमीकडून मोफत प्रशिक्षण, मोफत मार्गदर्शन आणि शिक्षण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तसेच मोफत वसतिगृहाची सुविधा अशा सुविधा मोफत देण्यात येणार असल्याचे जगदाळे यांनी सांगितले.
या शिबीरामध्ये नाव-नोंदणीसाठी आणि अधिक माहितीसाठी सौरभ जगदाळे ७७९६७५५५५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
