महाराष्ट्रातील २५ गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ‘प्यूरीबॅग’चा वापर होणार..

पुणे : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये असलेले उत्तम संबंधाचा उपयोग पर्यावरण आणि शाश्वस्त विकासासाठी होणारा आहे. दोन्ही देशाचे पंतप्रधान हे एकमेकांच्या संपर्कात असतात व त्यामुळे दोन्ही देशांमधले चांगले संबंध टिकून आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संशोधित झालेले प्यूरीबॅग हे उत्पादन भारतासाठी खूप फायद्याचे आणि उपयोगाचे ठरेल. महाराष्ट्रातील किमान २५ ग्रामीण गावांमध्ये ह्या उत्पादनाचा वापर होणार असल्यामुळे, आम्हाला त्याचा अभिमान आहे. यापुढील काळातही दोन्ही देश एकमेकांना कायम साथ देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सिल जनरल पीटर ट्रस्टवेल यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी शुद्ध, निर्धोक आणि स्वच्छ मिळावे यासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासाचे कॉन्सिल जनरल पीटर ट्रस्टवेल आणि व्हाईस कॉन्सिल जोएल अॅडसेट हे शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्य करणार्याट वनराई संस्थेला भेट दिली. यावेळी वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया, विश्वस्त धन्यकुमार चोरडीया, फैजान मुक्कादम यावेळी उपस्थित होते.
वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सरकार, संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने भारतामध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने आणखीन चांगले कार्य करण्याचा मानस वनराईचा आहे. त्याचीच सुरुवात ऑस्ट्रेलियन संशोधकांनी उत्पादन केलेल्या ‘प्यूरीबॅग’च्या माध्यमातून झाली आहे. दूषित पाण्याने जूलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जीवाणूंचे आजार, जंतू वाढ यासांरखे आजार बळावतात. यासर्व आजारांना अटकाव ‘प्यूरीबॅग’ करते. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांच्या स्वच्छ व निर्धोक पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातील प्रश्न यानिमित्ताने मिटणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: