fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशांत जगताप यांची शालेय साहित्य “तुला”

 

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहर मध्यवर्ती कार्यालय येथे जगताप यांची शालेय साहित्याची “तुला” करण्यात आली. 

याप्रसंगी बोलताना प्रशांत जगताप यांनी सांगितले कि महाराष्ट्रातील इतर राजकीय समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी भोंग्याचे वाटप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता सामाजिक भान लक्षात घेऊन शालेय साहित्याचे वाटप करत आहे, याचा मला सर्वस्वी अभिमान आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची हि भूमिका भूषणावह आहे. याप्रसंगी मातृपितृ संस्कारांनुसार प्रशांत जगताप यांचे आई वडील यांचेही औक्षण आणि सन्मान करण्यात आला. 

या उपक्रमाचे आयोजन आणि संकल्पना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्य शिल्पा भोसले आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस संतोष जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कसबा मतदारसंघ अध्यक्ष गणेश नलावडे यांनी केले. प्रदेश प्रवक्ते प्रदिप देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. 
या उपक्रमासाठी नगरसेवक वनराजजी आंदेकर, प्रिया गदादे पाटील, स्वाती पोकळे, संतोष नांगरे, गणेश कल्याणकर, अभिजित बारवकर, संदीप पवार, मनाली भिलारे, दिपक पोकळे, राहुल गुंड, पूनम बनकर, सारिका पारेख, रत्ना नाईक, वैजयंती घोडके, ज्योतीताई सूर्यवंशी, आप्पा  जाधव, अनिल आगवणे आदी अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शालेय साहित्याचे विशेष सहकार्य केले. 
वरील सर्व शालेय साहित्य पुणे शहरातील विविध भागातील, गोर गरीब वसाहतींमधील गरजवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वितरित करण्यात येणार आहे. 
याप्रसंगी बोलताना आयोजक संतोष यांनी सांगितले कि, “राज्यातील तरुणाईमध्ये जाती – धर्माच्या नावाने द्वेष पसरवण्यासाठी काही विकृत मनोवृत्तीचे लोक भोंग्याचे वाटप करत असल्याच्या वातावरणातच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्याची संकल्पना पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष मा. प्रशांतदादा जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आली. जातीय – धार्मिक द्वेष पसरवू पाहणाऱ्यांना हि योग्य चपराक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सामान्य कार्यकर्ताही सतत सामान्य नागरिकांसाठी विधायक उपक्रम राबवण्याला प्राधान्य देत असतो हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.  
तसेच शिल्पा भोसले यांनी सांगितले कि, “हिंदू संस्कृतीमध्ये वाढदिवसाचे औक्षण आणि त्यानिमित्ताने समाजाप्रती असलेली आपली कार्यतत्परता हि या उपक्रमाच्या माध्यमातून साधण्याचा एक चांगला प्रयत्न आम्ही केलेला आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading