fbpx

मोगरा महोत्सवात ‘दगडूशेठ’ ला ५० लाख फुलांचा सुवासिक पुष्पनैवेद्य

पुणे : मोग-यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त ५० लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य गणरायाला दाखविण्यात आला होता. अंगारकी चतुर्थीनिमित्त कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्याकरीता भाविकांनी मोठी गर्दी केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते.

पुष्पसजावटीची तयारी तब्बल १०० महिला व १२५ पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ७०० किलो मोगरा, २५ हजार चाफा, ५० हजार गुलाब, ५० किलो कन्हेर, जाई, जुई, केवळा, कमळ, ५०० किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: